MCX Cotton Market खुशखबर कापसाचे भाव वाढणार, आज पासून कापसाचे वायदे बाजार सुरू

शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून आहे. राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले असताना कापसाला मिळणारा भाव मात्र अत्यल्प असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस तसाच पडून आहे. एकीकडे शासन कापसाच्या (MCX Cotton Market) भावाविषयी कोणती हि हालचाल करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकटच उभे राहिले आहे. या दरम्यान सोमवारपासून कापसाचे वायदे बाजार सुरू करण्यात येणार असून यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.

सध्या कापसाचे भाव 7500 ते 8100 रुपये प्रतिक्विंटल आहे. यामध्ये देखील मोठी खरेदी-विक्री नसल्याचे दिसून येत आहे. सेबीने कापूस वायद्यावरील बंदी उठविल्यानंतर सोमवारपासून कापूस वायदे सुरू होणार आहेत. सेबीच्या आदेशानुसार कापसाची खरेदी गाठीन ऐवजी खंडी मध्ये केली जाणार आहे. आणि नवीन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी MCX वर कापसाच्या गाठींचा 172 किलो कापूस व्यवहार होत होता. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे तो व्यवहार खंडीमध्ये (356 किलो कापूस) असा केला जाणार आहे. यापूर्वी 25 गाठींचे प्रिंटिंग युनिट होते. आता त्याचे 48 विभाग करण्यात आले आहेत. तसेच कमाल ऑर्डर आकारात 1200 गाठींवरून 576 गाठींवर लक्षणीय बदल झाला आहे असे देखील सांगण्यात आले आहे.

👉आजच्या कापूस दरात मोठी वाढ.👈

नवीन वितरण केंद्र यापूर्वी MCX Cotton Market ची यवतमाळ, जालना, कडी, मुंद्रा (गुजरात), आलियाबाद, तेलंगणा येथे वितरण केंद्रे होती. त्यामध्ये आता आणखी पाच वितरण केंद्रांची भर पडली आहे. नवीन केंद्रांमध्ये इंदूर (मध्य प्रदेश), भिलवाडा (राजस्थान), गुंटूर (आंध्र प्रदेश), रायचूर (कर्नाटक) आणि सेलम (तामिळनाडू) यांचा समावेश करण्यात आला आहे.

👉आजच्या कापूस दरात मोठी वाढ.👈

सेबीने निर्माण मध्ये केलेले बदल शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. या बदलांमुळे वायदा मार्केटमधील नफ्याचे मार्जिन कमी होईल. शिवाय या बदलांमुळे कापूस उत्पादकांपासून ते वस्त्र उत्पादकापर्यंतच्या साखळी मधील सर्व दिव्यांचा फायदाच होणार आहे.

इसे शेयर करें 👇👇👇

Leave a Comment