कापसाच्या दरात (Mcx Cotton Rate) आजही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा बघायला मिळाली आहे. मात्र कापसााची आवक (Cotton Arrival) अजूनही वाढलेली नाही, असं उद्योगांनी सांगितलं आहे. आज कापसाचा किमान दर काही राज्यांमध्ये वाढला होता तर कमाल दराने देखील काही ठिकाणी उसळी घेतली होती.
MCX Cotton Prices : शेतकऱ्यांसाठी नियमात बदल ‘गाठी’ ऐवजी ‘खंडी’ त व्यवहार
देशातील बाजारात दिवाळीनंतर कापसाची आवक (Arrival of Cotton) कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) वाढले आहेत. त्यातच उद्योगांनी आता कापसाची खेरदी सुरु केली आहे. परिणामी कापसाची दरवाढ सुरुच आहे. सध्या कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ९ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
आज महाराष्ट्रात कापसाला (Mcx Cotton Rate Today) सरासरी ८ हजार ते ९ हजार २०० रुपये दर मिळाला आहे. तर कर्नाटकात ८ हजार ५०० ते ९ हजार ९०० रुपये आणि, गुजरातमध्ये ८ हजार ते ९ हजार ३०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले आहेत. उत्तरेतील हरियाना, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील सरासरी दर हा ८ हजार ते ९ हजार ३०० रुपये या दरम्यान होता.