Panjabrao Dakh शेतीमालाचे नुकसान होऊ देणार नाही : पंजाबराव डंख

शेतकरी मेळावा दि. ४ – वेळोवेळी हवामानाचा अचूक अंदाज देऊन मी नैसर्गिक आपत्तीने तुमच्या एका रुपयाचेही शेतमालाचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjabrao Dakh) यांनी शिवना (ता. सिल्लोड) येथे शेतकरी मेळाव्यात दिली.

हवामानतज्ञ पंजाब डख यांचा नुकताच ग्रामस्थ व शिवाई देवी मंदिर विश्वस्त समितीतर्फे संस्थानचे अध्यक्ष सुभाष होळकर व बालाजी संस्थान तर्फे अध्यक्ष व्ही. के. राऊत, उपाध्यक्ष काशिनाथ काळे व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवना- धोत्रा रस्त्यावरील श्री गणेश रोपवाटिकेचे उद्घाटन करण्यात आले.

पूर्वजांनी निसर्गाचे अनेक ठोकताळे दिलेले आहेत. लिंबाच्या झाडाला निंभोळ्या लगडणे, बिब्याच्या झाडाला बिबे लागणे, चिंचेच्या झाडाला चिंचा लगडणे, सरड्याच्या डोक्यावरील तुरा लाल होणे, घोरपडींनी बिळातून तोंड बाहेर काढणे, दुचाकी समोर पंख फुटलेले काजवे येणे अशी अनेक लक्षणे पावसाच्या आगमनाचा अंदाज देतात, असेही Panjabrao Dakh म्हणाले.

याशिवाय त्यांनी पाऊस येण्याची वैज्ञानिक कारणेही विशद केली. शेतकऱ्यांनी सोयाबीन, हरभरा, मका, कपाशी लागवड कशी करावी. कोणती खते, कीटकनाशके वापरावीत, पेरणीचे अंतरकिती ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पी. आर. राऊत,आभार संजय काळे यांनी मानले.

इसे शेयर करें 👇👇👇

Leave a Comment